

Taradal Assault Case
esakal
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे पत्नीला मदत करत असल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी चाकूने सपासप वार करून हल्ला केल्याची गंभीर घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी धनाजी शामराव मंडले (वय ३५, रा. जत, जि. सांगली), अविनाश बनसोडे (रा. नेहरूनगर, इचलकरंजी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी यासीन अकबर मुल्ला (३४, रा. कारंडे मळा, शहापूर) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास धनाजी मंडले याने यासीन मुल्ला याला फोन करून श्रीरामनगर, गल्ली क्रमांक तीन, तारदाळ येथे बोलावून घेतले. यावेळी अविनाश बनसोडे याने यासीन याच्यावर धावून जात शिवीगाळ केली. त्यानंतर धनाजी मंडले याने चाकूने यासीन याच्या पोटावर, हातावर, गळ्यावर तसेच पाठीवर वार केले.
धनाजी मंडले याची पत्नी अश्विनी मंडले या श्रीरामनगर परिसरात त्याच्यापासून विभक्त राहत आहे. अश्विनी यांना यासीन मदत करत असल्याचा राग धनाजीच्या मनात होता. याच कारणातून हा हल्ला झाल्याची फिर्याद मोसीन मुबारक सुतार (२७, रा. रुई, ता. हातकणंगले, सध्या शहापूर) याने दिली. चाकूहल्ल्यात यासीन गंभीर जखमी झाला आहे. आयजीएम रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून शहरातील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी हलवले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.