चिपळुणात भाजपाने केली स्मशानभूमीची स्वच्छता

चिपळुणात भाजपाने केली स्मशानभूमीची स्वच्छता
Published on

-ratchl७५.jpg-
26O35948
चिपळूण ः स्मशानभूमीत स्वच्छतामोहिमेत सहभागी झालेले भाजपाचे पदाधिकारी.
------
रामतीर्थ स्मशानभूमीची स्वच्छता
भाजप स्थापना दिन ; चार ट्रॅक्टर कचरा संकलन,
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण शहर मंडलाच्यावतीने भाजप स्थापनादिनानिमित्त रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यांनी या परिसरातील चार ट्रॅक्टर कचरा संकलित केला. संपूर्ण स्मशानभूमी पाण्याने धुवून काढण्यात आली.
भाजपच्या ४६वा स्थापना दिवस विविध जनोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. काल (ता. ७) सकाळी रामतीर्थ स्मशानभूमी सफाई करण्यात आली. पालापाचोळा, हार, गवत, बाटल्या, धूळ पूर्णपणे झाडून डिटर्जंटचा वापर करून फिनेल टाकून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतामोहीम यशस्वी करण्यासाठी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका शीतल रानडे, सरचिटणीस सारिका भावे, अभय चितळे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com