Uday Samant : नेता असावा तर असा! सामंतांच्या रूपात 'देवमाणूस' धावून आला अन् शालिनीला मिळालं नवं आयुष्य

उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या रूपातच देवमाणूस त्या गरीब कुटुंबीच्या मदतीला धावून आला.
Uday Samant
Uday Samantesakal
Summary

शालिनी रपशे ही ब्रेन ट्युमर (Brain Tumor) या गंभीर आजाराने त्रस्त होती.

रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या रूपातच देवमाणूस त्या गरीब कुटुंबीच्या मदतीला धावून आला आणि तिला नवे आयुष्य मिळाले. लांजा तालुक्यातील गोळवशी-खांबडवाडी येथील पर्शुराम रपशे यांची मुलगी शालिनी रपशे हिला ब्रेन ट्युमर झाला.

Uday Samant
NCP Crisis : तब्बल 40 वर्ष ऋणानुबंध; पाटणकरांचा पराभव झाला, तरी पवारांचं प्रेम कमी झालं नाही, हा इतिहास आहे!

परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. मंत्री सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवून शालिनीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. सामंत यांच्या प्रयत्नामुळे एका मोठ्या आजारातून शालिनी हिला नवे आयुष्य मिळाले.

Uday Samant
NCP Crisis : राष्ट्रवादीत उभी फूट; अजितदादांची ताकद भाजपच्या पथ्यावर? थोरल्या पवारांचा 'हा' गड अभेद्य!

शालिनी रपशे ही ब्रेन ट्युमर (Brain Tumor) या गंभीर आजाराने त्रस्त होती. तिच्यावर औषधोपचार सुरू होते तसेच ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया महाग असल्याने रपशे कुटुंबीय चिंतेत होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एवढे पैसे त्वरित उभे करणे हे एक मोठे आव्हान रपशे कुटुंबीयांसमोर होते.

शालिनीचे वडील पर्शुराम रपशे मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांची भेट घेऊन कैफियत सांगितली. त्यानंतर बाईत यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला.

Uday Samant
Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; गृहमंत्री म्हणाले, 'CBI कडं तपास देणार नाही'

त्यानंतर शालिनी हिच्यावर कोल्हापूर बिन्स हॉस्पिटल येथे ब्रेन ट्युमर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपयांचा निधी मिळाला. याबाबत शालिनीचे वडील पर्शुराम रपशे यांनी पालकमंत्री सामंत, नगराध्यक्ष मनोहर बाईत यांचे आभार मानले. मुख्यमंत्री वैद्यकीय मदतकक्षाच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्या रूपात देवमाणूस मदतीला धावला, अशी प्रतिक्रिया पर्शुराम रपशे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com