Jain Muni Case : शरीराचे तुकडे करुन जैन मुनींची निर्घृण हत्या; गृहमंत्री म्हणाले, 'CBI कडं तपास देणार नाही'

नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder Case
Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder Caseesakal
Summary

परमेश्वर यांनी जैनमुनी हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एडीजीपी यांच्यांशी फोन करून चर्चा केली आहे.

Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder : चिक्कोडीजवळच्या हिरेकोडीमधील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार महाराज यांची निर्घृण हत्याप्रकरणानंतर जैन मुनींना संरक्षण देण्याची मागणी नवग्रहतीर्थ क्षेत्राचे आचार्य गुणधरनंदी महाराज यांनी केली.

Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder Case
मोठी बातमी! जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत, तपासासाठी 500 पोलिस तैनात

जैन मुनी, जैन बसदींना संरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन हाती घेतले होते. गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी काल (ता. १०) येथे भेट देऊन जैन मुनींना रक्षण देण्याबाबत ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेतले. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची गरज नसल्याचेही परमेश्वर यांनी स्पष्ट केले.

Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder Case
Belgaum : जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत; संशयितांकडून हत्येची कबुली, मठाकडं भाविकांची रीघ

जैन मुनी हत्या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु आहे. डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पण, तपासानंतर काही मुद्दे पुढे आले आहेत. कोणामुळे घटना घडली, त्याकडे गुणधरनंदी महाराजांनी लक्ष वेधले. सरकार जैन समाजाच्या पाठिशी असल्याची ग्वाही चर्चेदरम्यान दिल्याचे परमेश्वर यांनी सांगितले.

परमेश्वर यांनी जैनमुनी हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एडीजीपी यांच्यांशी फोन करून चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही माहिती घेतली आहे. जैन स्वामींच्या यात्रेदरम्यान संरक्षण मिळावे, अशा मागण्या झाल्या होत्या.

Jain Muni Kamkumar Nandi Maharaj Murder Case
NCP Crisis : राष्ट्रवादीत उभी फूट; अजितदादांची ताकद भाजपच्या पथ्यावर? थोरल्या पवारांचा 'हा' गड अभेद्य!

त्यानंतर मंदीर, जैन मुनींना संरक्षण दिले जाईल. स्वतंत्र महामंडळाची मागणीही केली आहे. साऱ्या गोष्टींवर हळूहळू कार्यवाही करण्यात येईल. मात्र, यात कोणीही राजकारण करु नये. लोकप्रतिनिधीने विषयाचे गांभीर्य ओळखून बोलावे. जैन मुनी हत्या प्रकरण सीबीआयला सोपवण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com