

Yash Thakur | India vs Zimbabwe 2nd T20I
Sakal
Zimbabwe vs India T20I Marathi News : भारताचा टी२० संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यात असून या तीन सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात आशोक शर्माला पदार्पणाचीही संधी देण्यात आली. पण त्याला पहिल्या सामन्यात काही खास करता आले नाही, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्या जागेवर विदर्भाचा (Vidarbha) २७ वर्षीय वेगवान गोलंदाज यश ठाकूरला (Yash Thakur) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यामुळे यशचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले.
विशेष म्हणजे यशने त्याच्या पदार्पणातच सर्वांना प्रभावित केले. दुसऱ्या सामन्यात भारताला पहिली विकेटही यशनेच मिळवून दिली. त्याने आक्रमक खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या सलामीवीर ब्रायन बेनेटला ३२ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर त्याने ताडिवानाशे मारुमनीलाही बाद केले. त्याने या सामन्यात ४ षटकात ३० धावात २ विकेट्स घेतल्या. हा सामना भारताने ९० धावांनी जिंकला.