

Ruturaj Gaikwad | India A vs Australia A ODI Series
Sakal
India A vs Australia A ODI Series Where to Watch: भारताच्या वनडे संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकली. या मालिकेत ऋतुराज गायकवाडही (Ruturaj Gaikwad) भारतीय संघाचा भाग होता. पण ही मालिका संपल्यानंतर लगेचच तो आता कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. यानंतर आता ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेसाठी ऋतुराज भारत अ संघाचा कर्णधार आहे.