India A vs Australia A first unofficial Test result
esakal
India A vs Australia A first unofficial Test result: भारत अ संघाने पहिल्या अनऑफिशियल कसोटीत ऑस्ट्रेलिया अ संघावर १६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कुमार कुशाग्रने फलंदाजीत कमाल दाखवली, परंतु तुषार देशपांडे, शाम्स मुलानी व तनुश कोटियन या मुंबईकर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजाबून बाजी मारली. भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या २६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २०० धावांवर गारद झाला. पहिल्या डावात ४ विकेट्स घेणाऱ्या मुलानीने दुसऱ्या डावात ३ बळी टिपले.