

South Africa vs Pakistan: पाकिस्तान क्रिकेट संघाला सोमवारी दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात १० विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तानवर कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारण्याची वेळ आली.
दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील पहिला सामनाही जिंकला होता आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले होते. आता दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यातही पराभूत करत मालिका २-० अशी जिंकली. दरम्यान, दुसऱ्या सामन्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही मोठी धक्का दिला आहे.