IND vs NZ, 2nd Test: दुसऱ्या कसोटीतही सिराज-जडेजाला डच्चू? शुभमन गिलने Playing XI बाबत दिले महत्त्वाचे संकेत

Will Siraj and Jadeja Miss the 2nd Test Against New Zealand Too? भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अनिर्णित राहिलेल्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजला संधी मिळाली नव्हती. याबाबत बरीच चर्चा झाली होती. आता दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबत गिलने संकेत दिले आहेत.
Shubman Gill | Mohammed Siraj | Ravindra Jadeja | India vs New Zealand Test

Shubman Gill | Mohammed Siraj | Ravindra Jadeja | India vs New Zealand Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वेलिंग्टनला झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आता मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना निर्णायक असणार आहे. पहिल्या सामन्यात ३५२ धावांची आघाडी घेऊनही भारताला हा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे अनेक गोष्टींवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पण यातही हा सामना सुरू झाल्यापासून एका गोष्टीबद्दल सातत्याने चर्चा होत आहे, ती म्हणजे मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा (Mohammed Siraj & Ravindra Jadeja) यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने. त्यावर भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) पहिल्या कसोटीनंतर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने स्पष्टीकरण देताना दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबतही संकेत दिले.

Shubman Gill | Mohammed Siraj | Ravindra Jadeja | India vs New Zealand Test
IND vs NZ, 1st Test: भारताच्या हाताशी आलेला विजय निसटला! वेलिंग्टन कसोटी ड्रॉ होण्यामागची ४ कारणं कोणती?
Loading content, please wait...