Womens World Cup Points Table : पाकिस्तान तळाला; भारतीय महिला संघ कुठे?

ICC Womens World Cup 2022 Points Table
ICC Womens World Cup 2022 Points Table Sakal

ICC Womens World Cup 2022 Points Table : न्यूझीलंडच्या मैदानात महिला विश्वकप स्पर्धा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी झालेल्या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी (Australia Women) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या बाजूला पाक कर्णधार बिस्माह मारुफ (Bismah Maroof ) ची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. पाकिस्तानला (Pakistan Women) स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन संघ दोन विजयासह 4 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे.

भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिलीये. या विजयाच्या जोरावर भारतीय महिला (India Women)संघ 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघानेही (South Africa Women) भारतीय संघाप्रमाणे पहिला सामना जिंकलाय. पण पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयामुळे रनरेटच्या जोरावर मिताली ब्रिगेड ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

ICC Womens World Cup 2022 Points Table
अंपायरच्या खुर्चीवर रॅकेट आपटणाऱ्या झ्वेरेव्हवर निलंबनाची कारवाई

न्यूझीलंड महिला संघाने (New Zealand Women) दोन सामन्यातील एक सामना जिंकला असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या तर वेस्ट इंडीज महिला संघाने (West Indies Women) पहिला सामना जिंकून दोन गुणासह पाचवे स्थान मिळवले आहे. स्पर्धेतील प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला इंग्लंड महिला संघ (England Women) अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच्याशिवाय बांगलादेश (Bangladesh Women) आणि पाकिस्तान (Pakistan Women) सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.

ICC Womens World Cup 2022 Points Table
Women's Day: कॅप्टन आईने महिला दिनी मुलीला दिले 'आदर्श' गिफ्ट

महिला वर्ल्ड कप स्पर्धा ही राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे आठ संघ प्रत्येकाशी एक एक सामना खेळतील. पहिले चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com