

Viral Video
esakal
Virat Kohli viral video: आयपीएल 2026 च्या हंगामात आज 8 दिवसानंतर विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मैदानात उतरणार आहे. हंगामाची सुरुवात गतविजेत्या बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाली होती. हंगामाच्या सुरुवातीलाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयाने आपल्या हंगामाची सुरुवात केली आहे. त्यात विराट कोहलीने 38 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आज हंगामाच्या दुसऱ्या सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि 5 वेळेचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने असणार आहेत. सामन्याच्या अगोदर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक विराट कोहलीचा मी विदेशी खेळाडू नाही असा म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.