Video: डिव्हिलियर्स बाद झाल्यावर त्याच्या मुलाने काय केलं पाहा..

Ab-De-Villiers-Son-Video
Ab-De-Villiers-Son-Video
Summary

IPL 2021: बाबा आऊट झाले पाहून चिमुरड्याचा राग झाला अनावर

IPL 2021 in UAE: भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संघात रविवारी IPL चा सामना रंगला. कर्णधार विराट कोहलीच्या RCB ने रोहितच्या मुंबई इंडियन्स संघावर सहज विजय मिळवला. हर्षल पटेलने घेतलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर बंगळुरूने मुंबईला ५४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सकडून बंगळुरूच्या संघाला खूप अपेक्षा होत्या. त्याने सुरूवात चांगली केली होती, पण त्यानंतर मात्र तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर त्याच्या मुलाने जे केलं त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Ab-De-Villiers-Son-Video
IPL 2021: कृणाल पांड्याचं करायचं काय? मुंबईपुढे मोठा प्रश्न

एबी डिव्हिलियर्स फलंदाजी करत होता. त्याने आपल्या लौकिकाला साजेशी सुरुवात केली. १ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने आपण फलंदाजीला आल्याची वर्दी दिली. पण त्यानंतर डावाच्या सहाव्याच चेंडूवर तो उसळत्या चेंडूवर फटका मारायला गेला आणि झेलबाद झाला. वडिल बाद झाल्याचं मुलाने स्टेडियममध्ये पाहिले. त्यामुळे मुलाने थेट खूर्चीवर राग काढला. पण त्या गोंडस मुलाने खुर्चीवर हात आपटल्याने त्याच्याच हाताला दुखापत झाली अन् त्या चिमुरड्याने रडायलाच सुरूवात केली. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Ab-De-Villiers-Son-Video
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणारी पहिली टीम

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, बंगळुरूच्या संघाने मुंबईविरूद्ध २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. विराटने ४२ चेंडूत केलेल्या ५१ धावा आणि मॅक्सवेलने ३७ चेंडूत कुटलेल्या ५६ धावांच्या जोरावर बंगळुरूने ही मजल मारली. श्रीकर भरतनेही २४ चेंडूत ३२ धावा केल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या सलामीवीरांनी तुफान फटकेबाजी केली. मुंबईने 'पॉवर प्ले'च्या षटकात बिनबाद अर्धशतकी मजल मारली होती. कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूत ४३ धावांची आतषबाजी केली होती. पण तो बाद झाला आणि मुंबईच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. बिनबाद ५७ वरून मुंबईचा संघ १११ धावांवर पूर्ण बाद झाला. या लाजिरवाण्या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com