Krunal-Pandya-IPL
Krunal-Pandya-IPL

IPL 2021: कृणाल पांड्याचं करायचं काय? मुंबईपुढे मोठा प्रश्न

Published on
Summary

कृणालच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज

IPL 2021 in UAE: मुंबई इंडियन्स संघाचा रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दारूण पराभव केला. मुंबईचा संघ ६ षटकात बिनबाद ५७ धावांवर होता. पण सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी खराब कामगिरी केली आणि मुंबईच्या संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर बऱ्याच खेळाडूंवर टीका करण्यात आली. पण सर्वात जास्त टीका झाली ती कृणाल पांड्याच्या कामगिरीवर...

Krunal-Pandya-IPL
IPL सुरू असतानाच इंग्लंडच्या स्टार क्रिकेटपटूचा मोठा निर्णय

कृणाल पांड्याला टी२० विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण मुंबईच्या संघात मात्र त्याला सातत्याने झुकतं माप दिलं जातंय. यावरून मुंबईचे फॅन्स काहीसे नाराज झाल्याचे दिसून आले. कृणाल पांड्याला IPLच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. IPL 2021मध्ये मुंबईने १० सामने खेळले. या सर्व १० सामन्यांमध्ये कृणाल पांड्याचा संघात समावेश होता, पण त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही चमक दाखवता आलेली नाही. १० सामन्यात कृणालने केवळ १२१ धावा केल्या आहेत आणि केवळ ३ बळी टिपले आहेत. १३.४४च्या सरासरीने धावा करणाऱ्या कृणालची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ३९ आहे. त्याच्या पदरी सातत्याने येणारे अपयश संघासाठी लाजिरवाणे ठरत आहे.

Krunal-Pandya-IPL
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणारी पहिली टीम

कृणालने २०१६ ते २०२१ या कालावधीत ८१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने केवळ २०१६च्या हंगामात एक अर्धशतक झळकावले आहेत. त्यानंतरच्या कोणत्याही हंगामात त्याला अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याने ८१ सामन्यात २३च्या सरासरीने १,१२१ धावा केल्या आहेत. रविवारच्या सामन्यातदेखील ३ बाद ८१ या धावसंख्येवर मुंबईचा संघ असताना कृणालला फलंदाजीची संधी देण्यात आली होती. पण त्याने ती संधी वाया घालवली. त्याने ११ चेंडूत ५ धावा केल्या आणि मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. गोलंदाजीतही त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. कृणालची सातत्याने घसरणारी कामगिरी हा त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्याने लवकर कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे असल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com