IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणारी पहिली टीम

दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात आता 16 गुण जमा झाले आहेत.
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणारी पहिली टीम

IPL 2021 DC vs RR 36th Match Live Updated अबूधाबीच्या मैदानात राजस्थान रॉयल्सला रोखत दिल्लीने 33 धावांनी विजय नोंदवला. या विजयासह यंदाच्या हंगामातील आठवा विजय नोंदवत दिल्ली कॅपिटल्सने 16 गुणासह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. प्लॅ ऑफमध्ये जाणारी दिल्ली कॅपिटल्स ही पहिली टीम ठरलीये. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 154 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ 6 बाद 121 धावांपर्यंतच मजल मारु शकला. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसन एकटा लढताना दिसले. त्याने नाबाद 70 धावांची खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्याच्या कामी आली नाही.

धावफलकावर अवघ्या 18 धावा असताना शिखर धवनच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर काही अंतराने दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉच्या रुपात दुसरी विकेट गमावली. श्रेयस अय्यर आणि पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुस्ताफिझुरनं पंतला 24 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या हेटमायरलाही मुस्ताफिझुरनेच 28 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अखेरच्या षटकात ललित यादव 15 चेंडूत नाबाद 14 धावा आणि अश्विनच्या नाबाद 6 धावांसह दिल्ली कॅपिटल्सने धावफलकावर 154 धावा लावल्या. राजस्थान रॉयल्सकडून मुस्तफिझुर आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन-दोन तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

55-5 : अक्षर पटेलनं रियान परागची घेतली फिरकी, राजस्थान बिकट अवस्थेत

48-4 : महिपाल लोमरोरच्या रुपात राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का, रबाडाने त्याला 19 धावांवर बाद केले.

17-3 : अश्विननं डेविड मिलरला दिला चकवा, 7 धावा करुन तोही माघारी फिरला

6-2 : यशस्वी जयस्वालही अपयशी, अवघ्या 5 धावांवर नॉर्तजेनं दाखवला तंबूचा रस्ता

6-1 : लिविंगस्टोनच्या बढतीचा प्रयोग अपयशी; आवेश खानला मिळाली विकेट

142-6 : चेतन सकारियाला आणखी एक यश, अक्षर पटेल 11 धावा करुन तंबूत

121-5 : शिमरॉन हेटमायरच्या रुपात मुस्तफिझुर रहमानला दुसरे यश, हेटमायरनं 16 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने केल्या 28 धावा

90-4 : राहुल तेवतियाने घेतली अय्यरची विकेट, त्याने 32 चेंडूत एक चौकार 2 षटकाराच्या मदतीने 43 धावांची खेळी केली

83-3 : मुस्ताफिझुर रहमानने दिल्लीच्या कॅप्टनला दाखवला तंबूचा रस्ता, पंतने 24 चेंडूत 24 धावांची खेळी केली

21-2 : पृथ्वीही 10 धावा करुन बाद, चेतन सकारियाच्या गोलंदाजीवर लिविंगस्टोननं टिपला झेल

18-1 : सलामीवीर शिखर धवन 8 (8)स्वस्तात माघारी; कार्तिक त्यागीनं उडवला बोल्ड

असे आहेत दोन्ही संघ

Rajasthan Royals (Playing XI): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टिरक्षक/ कर्णधार), लायम लिविंगस्टोन, डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुत तेवतिया, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया, मुस्तफिझुर रहमान, तरबेझ शम्सी.

Delhi Capitals (Playing XI): पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/ कर्णधार), ललित यादव, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, नॉर्तजे, आवेश खान.

राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com