

Ravichandran Ashwin
sakal
IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम आजपासून सुरू होतोय, १० संघ, १३ ठिकाणे आणि ७० सामने खेळले जातील. गतविजेत्या RCB अन् सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या सामन्याने हंगामची सुरुवात होणार आहे. विराट कोहलीची बंगळूर यावर्षी मॅच जिंकून हंगामची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील, तर हैदराबादचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. आजपर्यंत RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 26 सामने झालेत ज्यात सनरायझर्स हैदराबादने 14 वेळा विराटच्या बंगळूरला हरवल आहे. त्याउलट रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB )11 वेळा सनरायझर्स हैदराबादला हरवलं. या दोन संघांमधील सामने बऱ्याचदा मोठ्या धावसंख्येचे राहिलेत. आयपीएल सुरू होण्याअगोदर अनेक दिग्गज आपल्या प्रतिक्रिया देत असतात, आणि आता माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने ऑरेंज कॅप कोण जिंकणार हे त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितल.