

Mukul Chaudhary
esakal
आयपीएल करिअरच्या तिसऱ्या सामन्यात लखनौकडून धुमाकूळ घालणारा खेळाडू मुकूल चौधरीने आपल्या फलंदाजीने कोलकताच्या हातातून सामना हिसकावत आपली ओळख निर्माण केली. त्याने मिळवून दिलेल्या विजयामुळे त्याला या हंगामात नवीन फिनिशर अशी ओळख मिळाली आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर गुरुवारी लखनौ आणि कोलकता यांच्यातील सामन्यात मुकूलने २७ चेंडूत नाबाद वादळी ५४ धावांची खेळी केली, त्यात त्याने २ चौकार आणि ७ षटकार मारले.