

Ravichandran Ashwin response on Chennai coaching role
esakal
Chennai Super Kings coaching discussion: भारताचा स्टार खेाडू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने एका चाहत्याला दिलेल्या उत्तरामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारताचा उजव्या हाताचा ऑफ-स्पिन गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याने क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली, असा रविचंद्रन अश्विन अनेक विक्रमांचा मालक आहे. आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.