

Maharashtra board officers Bribery Case
ESakal
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली. विद्युत ठेकेदाराच्या प्रलंबित बिलांच्या मंजुरीसाठी या दोघांनी सात टक्के कमिशनची मागणी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानुसार एसीबीने केलेल्या कारवाईत हे दोघे लाच घेताना सापडले.