MP Supriya Sule : पश्‍चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा मार्ग करा; सुप्रिया सुळे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

पश्‍चिम महाराष्ट्राला बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून महाडजवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. या लोहमार्गासाठी सर्वेक्षण करावे आणि याबाबत निर्णय घ्यावा.
Supriya Sule
Supriya Sule sakal
Updated on
Summary

पश्‍चिम महाराष्ट्राला बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून महाडजवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. या लोहमार्गासाठी सर्वेक्षण करावे आणि याबाबत निर्णय घ्यावा.

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्राला बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून महाडजवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. या लोहमार्गासाठी सर्वेक्षण करावे आणि याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सद्यःस्थितीत पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही. याशिवाय कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा कोणताही रेल्वेमार्ग नाही. ही परिस्थिती पाहता, लोणंद पासून भोर मार्गे महाडपर्यंत नवीन रेल्वेमार्ग झाल्यास या मार्गाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्यामुळे या नव्या रेल्वेमार्गाचा या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होईल, असेही सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Supriya Sule
Pune Thalinad Agitation : सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन; आमदार गायकवाड यांचा निषेध

या नव्या रेल्वेमार्गामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके व खडकवासला विधानसभा मतदार संघ आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. तसेच हा मार्ग पुणे - मिरज - बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ladki Bahin Yojana
DCM Sunetra Pawar
Supriya Sule on Vidyanand Bapat pune news
Supriya Sule Engages With Students At Siddheshwar Vidyalaya In Daund During E Learning Board Launch Ceremony
Marathi News Esakal
www.esakal.com