पुणे - ‘पाकिस्तानचे जे नागरिक व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटलेली आहे. त्यांना नोटिसा देऊन परत पाठविण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना ४८ तासांत बाहेर काढू. त्यावर पोलिस व्यवस्थित काम करत आहेत,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.