शाहरुख-सलमानसोबत जेव्हा बिग बी अमिताभ स्टेजवर मनसोक्त थिरकले होते, व्हिडिओ व्हायरल

big b
big b

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटींचे जुने व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होताना पाहायला मिळतायेत. नुकताच बॉलीवूडच्या अशा सुपरस्टार्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. तिघांनाही असा एकत्र डान्स करताना फार कमी लोकांनी पाहिलं असेल. 

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि सलमान खानसोबत बिग बी अमिताभ स्टेजवर परफॉर्म करत आहेत. हे तिघेही सगळ्यात आधी सलमान खानच्या साजन की आंखो मे प्यार हे गाणं गातात. त्यानंतर ते शाहरुख खानच्या सिनेमातलं तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणं गातात. आणि त्यानंतर अमिताभ यांच्या सिनेमातील पग घुंगरु बांध हे गाणं गात आहेत.

ही तीनही गाणी या सुपरस्टार्सची प्रसिद्ध गाणी आहेत. तिघांना एकत्र स्टेजवर पाहुन त्यांच्या चाहत्यांना चांगलीच ट्रीट मिळाली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिघांचाही खास लूक दिसून येतोय. तिघांनीही ब्लॅक लूकला पसंती दिली आहे. सोबतंच तिघांनी ब्लॅक गॉगल देखील घातला आहे. 

सध्या सलमान खान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वेळ घालवतोय. लॉकडाऊनच्या आधी तो तिथे पोहोचला होता मात्र लॉकडाऊनमुळे तो अजुनही तिथेच आहे. सलमान अभिनेत्री जॅकलीन आणि त्याच्या इतर काही नातेवाईकांसोबत फार्महाऊसवरंच आहे.

शाहरुखबाबत सांगायचं झालं तर तो मुंबईतील त्याच्या घरी आहे. नुकताच अब्रामसोबतचा त्याच्या व्हिडिओ चांगलाच हिट झाला होता. तर अमिताभ बच्चन देखील मुंबईतील त्यांच्या घरी आहेत. घरातंच बसून ते त्यांचं काम करत आहेत. नुकताच कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा पुढचा सिझनचा प्रोमो समोर आला आहे. बिग बी सध्या याचं प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहेत.   

amitabh bachchan dance with shah rukh khan and salman khan here throwback video  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com