Movie Clip Viral : कपिल शर्माच्या चित्रपटाची क्लिप व्हायरल; दिसला गंभीर भूमिकेत

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करीत असतो
Kapil Sharma's Movie Clip Viral
Kapil Sharma's Movie Clip ViralKapil Sharma's Movie Clip Viral

Kapil Sharma's Movie Clip Viral कपिल शर्माच्या (Kapil Sharma) चाहत्यांसाठी त्याच्या झ्विगाटो (Zwigato) या चित्रपटाची एक छोटीशी झलक समोर आली आहे. क्लिपमध्ये शर्मा गंभीर दिसत आहे. नेहमीच सगळ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माची ही स्टाइल चकित करणारी आहे. हा चित्रपट नंदिता दास यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ४७ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करीत असतो. परंतु, यावेळी त्याचा वेगळाच अवतार लोकांना पाहायला मिळणार आहे. कपिल हा एक उत्तम कॉमेडियन असण्यासोबतच चांगला गायक देखील आहे. कपिल शर्माची कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. जो कोणी कपिलच्या समोर असतो तो समोरच्या व्यक्तीला त्याच्या पंचलाईनने गप्प करतो.

Kapil Sharma's Movie Clip Viral
Aamir Khan : सात दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर आमिरसाठी आली आनंदाची बातमी

कपिल शर्माच्या (Kapil Sharma) नव्या झ्विगाटो या चित्रपटातही (Film) लोकांना अवाक करणार आहे. नंदिता दास दिग्दर्शित झ्विगाटो या चित्रपटाची क्लिप समोर आली आहे. झ्विगाटोमध्ये त्याला गंभीर भूमिकेत पाहून सर्वांना हसवणारा कपिल शर्माही हे करू शकतो यावर विश्वास बसणे कठीण आहे. व्हिडिओमध्ये कपिलसोबत त्याची को-स्टार शहाना गोस्वामीही आहे.

टी-शर्ट आणि पँट घालून छोट्या खोलीत बसलेला कपिल चित्रपटात त्याची पत्नी शहानासोबत वाद घालताना दिसत आहे. नंदिता दास यांचा हा चित्रपट समाजात पसरलेली गरिबी आणि गरीब लोकांच्या त्रासावर आधारित असणार आहे. हे व्हिडिओ क्लिप पाहून समजू शकते. कपिल शर्माने झ्विगाटोच्या प्रीमियरची माहिती इन्स्टाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ४७ व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये कपिल आणि शहाना यांचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Kapil Sharma's Movie Clip Viral
1,000 कोटी कशाला म्हणते भाऊ? Bigg Boss 16 साठी सलमान खान घेतोय एवढी रक्कम

कपिलच्या कॉमेडी शोचा नवा सीझन लवकरच

कपिल शर्मा लवकरच कॉमेडी शोचा नवा सीझन घेऊन येणार आहे. यावेळी शोमध्ये अनेक नवे कलाकार दिसणार आहेत. यासाठी ऑडिशन्स घेतले जात आहेत. कास्टिंग डायरेक्टर कपिल शर्माचा नवा सीझन उत्कृष्ट बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यावेळी शोमध्ये नवीन काय आहे हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com