Milind Soman Happy Birthday : सलमान, शाहरुख, आमिर त्याच्यापुढे सगळे फिकेच! फिटनेसचा नाद नाय

मिलिंद आपल्या चाहत्यांना फोटो देतानाही त्यांना फिटनेसचे महत्व समजावून सांगतो.
Milind Soman happy birthday fitness celebrity
Milind Soman happy birthday fitness celebrity esakal

Milind Soman happy birthday fitness celebrity : जे आहे ते आहे, आपण कुणाला घाबरत नाही, लोकं माझ्याविषयी काहीही बोलू देत मी माझ्या मतावर ठाम आहे. अशी भूमिका असणारा प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमणच्या फिटनेसचे रहस्य हा नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. मिलिंदला त्याच्या फिटनेसवरुन सातत्यानं तो प्रश्न विचारला जातो.

मिलिंद आपल्या चाहत्यांना फोटो देतानाही त्यांना फिटनेसचे महत्व समजावून सांगतो. मग तो चाहता कितीही मोठा किंवा लहान असेना त्याला एखादी अॅक्टिव्हिटी सांगून तो सेल्फी देतो. हे त्याच्या आजवरच्या अनेक व्हिडिओमधून दिसून आला आहे. बॉलीवूडमध्ये आपली स्वताची वेगळी ओळख, क्रेझ, इमेज अन् ब्रँड जपून ठेवण्यात मिलिंदला यश आले आहे. मात्र त्याचा हा प्रवास भलताच खडतर होता. Milind Soman Ankita Konwar Wedding

Amazon, Microsoft सारख्या कंपन्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे केंद्राचे ३ हजार कोटींचे नुकसान?

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांना मिलिंदनं फिटनेसच्याबाबत मागे सोडले आहे. मिलिंदचा आहार, त्याचा फिटनेस आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ याला मिळणारा प्रतिसाद जबरदस्त आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमधून मिलिंदविषयी नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या भावना काय आहेत हे दिसून येते. आज मिलिंदचा ५८ वा वाढदिवस असून आपण त्याच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

बॉलीवूड सेलिब्रेटी आणि मिलिंद सोमण...

तुम्ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी घ्या आणि मिलिंद सोमणसोबत त्यांची तुलना करुन पाहा तुम्हाला फिटनेसविषयी अनेक गोष्टी कळून जातील. वयानं अनेक अभिनेत्यांपेक्षा मोठा असणारा मिलिंद हा सलमान, शाहरुख आणि आमिर यांच्यापेक्षा जास्त फिट असल्याचे म्हटले जाते. याची साक्ष त्याचे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून येते. मिलिंद सोमणच्या फिटनेसविषयी बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटीही कौतुकानं त्याच्याबाबत बोलतात.

मिलिंद सोमण बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रेटींनी फिटनेसबाबत मार्गदर्शन करत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या मिलिंदनं पुढे अभिनेता म्हणूनही स्वताची वेगळी वाट निर्माण केली. आता तो फिटनेस ट्रेनर, सेलिब्रेटी जज म्हणून विविध रियॅलिटी शो मध्ये सहभागी होत असतो. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला फॉलो करणाऱ्या नेटकऱ्यांची संख्याही मोठी आहे.

मिलिंदनं बऱ्याचदा त्याच्या व्हिडिओमधून फिटनेसचे महत्व समजावून सांगितले आहे. त्यानं कोविडच्या काळात देखील आपल्या चाहत्यांना फिटनेस कसा जपावा, आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली होती. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मिलिंदनं देशातील विविध मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. त्यात त्यानं यश संपादन केले आहे. मानाचा आर्यनमॅन खिताबही आपल्या नावावर केला आहे.

Milind Soman happy birthday fitness celebrity
Aarya Season 3 Review : वाघीण आहे ती तिच्या पिलांना काही करायला जालं तर...! सुष्मितानं जिंकून घेतलं

मिलिंदनं लग्नाची बातमी लपवली नाही...

आपल्यापेक्षा वयानं तब्बल 26 वर्षांनी लहान असणाऱ्या अंकिताच्या प्रेमात मिलिंद पडला. त्याच्या प्रेमप्रकरणाची खूपच चर्चाही झाली होती. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मात्र हार मानेल तो मिलिंद कसला, त्यानं कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्याला काय वाटतं याचा विचार करुन अंकिताशी लग्न केलं. हे जोडपं फिटनेस फ्रीक म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय असल्याचे दिसून येते.

Milind Soman happy birthday fitness celebrity
Tejas Twitter Review: कंगनाचा तेजस सिनेमा कसा आहे? बघा लोकांच्या प्रतिक्रिया

पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मिलिंद अन् अंकितानं लग्नाचा निर्णय घेतला. २२ एप्रिल २०१८ या दिवशी त्यांनी लग्न केले. त्यावेळी सोशल मीडियावर त्यावरुन जे तुफान उठलं होतं त्याला मिलिंदनं मोठ्या धाडसानं उत्तर दिलं. त्यांनी पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाच्यावेळी मिलिंद हा ५२ वर्षांचा तर अंकिता ही २६ वर्षांची होती. सोशल मीडियावर या दोन्ही सेलिब्रेटींना त्यांच्या वयानुसार नेहमीच ट्रोल केले जाते.

Milind Soman happy birthday fitness celebrity
UT 69 Twitter Review : 'मी नाही त्यातला अन्....' प्रेक्षकांनी 'युटी ६९' पाहिल्यावर राजला धारेवर धरला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com