Aarya Season 3 Review : वाघीण आहे ती तिच्या पिलांना काही करायला जालं तर...! सुष्मितानं जिंकून घेतलं

भलेही ती गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या आजारपण आणि रिलेशनशिप यामुळे चर्चेत होती.
Aarya Season3 Review
Aarya Season3 Reviewesakal

Aarya Season3 Review : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. भलेही ती गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या आजारपण आणि रिलेशनशिप यामुळे चर्चेत होती. त्यानंतर आता ती तिच्या आर्या सीझन ३ वेबसीरिजमुळे लोकप्रिय होताना दिसत आहे. सुष्मिता सेनचा आगळा वेगळा अंदाज या मालिकेत दिसून येतो.

यापूर्वी आर्या या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात सुष्मिता सेन सोबत रॉनीत रॉय नावाच्या अभिनेत्यानं केलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. सुष्मिता सेन इतक्या प्रभावीपणे भूमिका वठवू शकते हे अनेकांना तिची आर्या मालिका पाहिल्यानंतर कळून चुकले. काही दिवसांपूर्वी तिची ताली नावाची मालिका आली होती. त्यात तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

आता आर्या ३ ने जाणकारांचे, समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणेएकेकाळी विश्वसुंदरीचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या अभिनेत्री सुष्मितानं यापूर्वी ज्या चित्रपटांतून भूमिका केल्या त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तिच्या काही भूमिका विनोदी स्वरुपाच्या होत्या. मात्र त्यातून सुष्मिताच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. आर्या मधून तिनं साकारलेली ती निर्भिड व्यक्तिरेखा चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

आपल्याला एक दिवस महिला डॉनची भूमिका करावी लागेल असे सुष्मिताला स्वप्नातही वाटले नसेल. आर्या मालिकेत तिला ती संधी मिळाली आणि तिनं त्या संधीचे सोने केले. सोशल मीडियावर त्याला नेटकऱ्यांनी दिलेला प्रतिसादही तुफान होता. आताच्या तिसऱ्या सीझनमध्ये सुष्मितानं कमाल केली आहे. या भूमिकेसाठी तिनं घेतलेली मेहनत दिसून येते. तिचं वर्कआऊट, व्यक्तिमत्व, हे सारं कमालीचे प्रभावी आहे.

राम माधवानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेचा तिसरा सीझनही तितकाच लोकप्रिय झाला आहे.त्यातील प्रसंग, चुरस लक्षवेधी आहे. त्यातील संघर्ष मनाला भिडणारा आहे. आणि कथेला साजेशी अशी कलाकारांनी निवड, त्यांनी आपल्या भूमिकेला दिलेला न्याय यामुळे आर्या ३ प्रभावी झाला आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी कलाकार आणि मेकर्सचं कौतुक केलं आहे. तिसऱ्या सीझनमध्ये आर्याचा राग आणखी अनावर झालेला आहे. तिच्या दुष्मनांची संख्या आता वाढली आहे.

तिच्या मुलांनी जे काही केले आहे त्यामुळे वेगळे प्रश्न निर्माण झाले आहे. आर्याला या सगळ्याला कसे सामोर जायचे हेच कळत नाहीये. आपल्याच माणसांशी तिला पंगा घ्यावा लागत आहे. आर्या या सगळ्याला कसे सामोरं जाते हे पाहण्यासाठी तिसऱ्या सीझनची वाट धरावी लागेल. त्यातून आर्या तिच्या यापूर्वीच्या शत्रुंचा बदला घेते का याचेही उत्तर चाहत्यांना मिळेल यात शंका नाही. पण या सगळ्यात कथेनं आणखी एक अनपेक्षित वळण घेतले आहे ज्याचा आपण विचारही करत नाही. त्यातून दिग्दर्शकाला नवं काही सुचवायचं तर नाही ना असा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून आपल्याला पडतो.

Aarya Season3 Review
12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

गुन्हेगारी जगत, त्या जगतात जे काही होते आहे त्याचे चित्रण यापूर्वी वेगवेगळ्या मालिकांमधून समोर आले आहे. आर्या च्या मालिकांमधून ड्रग्ज कनेक्शन, अंमली पदार्थांचा सर्रास होणारा वापर, त्याची होणारी तस्करी आणि त्याचा होणारा अतिरेक यावर आर्यातून करण्यात आलेले भाष्य प्रभावी आहे. शेवटी काय तर हीच गोष्ट जेव्हा आपल्या मुलांपर्यत येऊन थांबते तेव्हा वाघीण आर्या काय करते याचे उत्तर तिसरा सीझन पाहिल्यावर मिळते.

--------------------------------------

सीरिजचे नाव - आर्या सीजन 3

कलाकार - सुष्मिता सेन , इंद्रनील सेनगुप्ता , इला अरुण , विकास कुमार, आणि विश्वजीत प्रधान

दिग्दर्शक - कपिल शर्मा , श्रद्धा पासी जयरथ आणि राम माधवानी

रेटिंग - 3/5

Aarya Season3 Review
Tejas Twitter Review: कंगनाचा तेजस सिनेमा कसा आहे? बघा लोकांच्या प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com