UT 69 Twitter Review : 'मी नाही त्यातला अन्....' प्रेक्षकांनी 'युटी ६९' पाहिल्यावर राजला धारेवर धरला!

शिल्पाच्या पतीचा राज कुंद्राचा युटी ६९ हा आज प्रदर्शित झाला आहे.
UT 69 Movie review Raj Kundra Shilpa Shetty
UT 69 Movie review Raj Kundra Shilpa Shetty

UT 69 Twitter Review : पॉर्नोग्राफी प्रकरणात दोन आठवड्यांहून अधिक काळ जेलमध्ये असणाऱ्या राज कुंद्राची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. शिल्पाचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्याची ओळख होती. त्याची लोकप्रियताही बऱ्यापैकी होती. पण जेव्हा तो त्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला त्यानंतर मात्र त्याच्यावर टीका होऊ लागली. UT 69 Movie review Raj Kundra Shilpa Shetty

शिल्पाच्या पतीचा राज कुंद्राचा युटी ६९ हा आज प्रदर्शित झाला आहे. ज्याची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. राज जो जेलमध्ये होता. त्याच्या जेलमध्ये जाण्यानं शिल्पाला प्रचंड प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. तिची मोठी बदनामीही झाली होती. शिल्पाला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोलही केले होते. या सगळ्यावर राजनं चित्रपटाची निर्मिती केली आहे. तो चित्रपट कसा आहे आणि लोकांना कसा वाटला हे आपण जाणून घेणार आहोत.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

जेलमध्ये असताना आपल्याला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागलं हे राजनं त्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात राज जेव्हा आपण हा चित्रपट तयार करणार आहोत असे शिल्पाला सांगितले होते तेव्हा तिनं त्याच्यावर आगपाखड केली होती.कारण त्या प्रकरणात शिल्पाला झालेला मानसिक त्रास मोठा होता. राजला देखील त्याची कल्पना होती. कारण संपूर्ण कुटूंबाला वेगळ्या संघर्षातून जावं लागले होते.

राजच्या युटी ६९ मध्ये त्यानं आपण कशाप्रकारे निर्दोष आहोत आणि आपल्याला कशाप्रकारे फसवण्यात आले हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज हा सध्या जामिनावर बाहेर आहे. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर आपल्या कुटूंबाची बदनामी करण्यात आली असेही राजनं चित्रपटातून सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न केला आहे.त्यावर शिल्पाची आलेली प्रतिक्रियाही राजचा उत्साह वाढविणारी आहे.

नेटकऱ्यांनी राजचा युटी ६९ पाहिल्यावर त्याच्यावर प्रचंड टीका केली आहे. आपणच सगळं काही केलं आणि त्यानंतर आपण काहीच केलं नाही अशा प्रकारची बतावणी त्यानं त्या चित्रपटातून केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी, प्रेक्षकांनी केला आहे. आपली प्रतिमा युटी ६९ च्या माध्यमातून उजळवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून राजनं केला आहे. दुसरीकडे अनेकांनी राजच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

युटी ६९ मध्ये फक्त राजचा अभिनय चांगला आहे. बाकी कथेच्या नावानं सगळी बोंब आहे. आपण किती चांगले आहोत आणि आपल्याला कशाप्रकारे फसविण्यात आले हे त्यानं प्रत्येकवेळी जिथं शक्य होईल त्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही अंशी तो यशस्वी झाला आहे. हा चित्रपट सोशल मीडियावरुन लोकप्रिय होईल आणि त्यातून त्याला प्रसिद्धी मिळेल. असे काही जणांचे म्हणणे आहे.

UT 69 Movie review Raj Kundra Shilpa Shetty
Aarya Season 3 Review : वाघीण आहे ती तिच्या पिलांना काही करायला जालं तर...! सुष्मितानं जिंकून घेतलं

युटी ६९ च्या वेळेस मृणाल ठाकूरचा ऑख मिचोली आणि अर्जून कपूर, भूमि पेडणेकरचा द लेडी किलर प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटांसोबत युटी ६९ ची टक्कर आहे. त्यामुळे त्यात कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

UT 69 Movie review Raj Kundra Shilpa Shetty
12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com