

सध्या झी मराठीवर 'अग अग सुनबाई काय म्हणता सासुबाई' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कारण या मालिकेत सासू-सुनेची आंबट गोड केमिस्ट्री मांडली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सुनेच्या तर सासूच्या भूमिकेत सुकन्या मोने यांची जुगलबंदी बघायला मिळत आहे.
आजच्या आधुनिक काळात, सासू-सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास ' मालिकेत पाहतोय. सासू सुनेच नातं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना. असच काहीतरी या दोघांच्या नात्यात आहे.
झालं असं की, या मालिकेत सासु सुनेच एकमेकांशी पटत नाही पण जेव्हा त्याच्या विरुद्ध गोष्टी होतात तेव्हा दोघी एकत्र होतात. जेव्हा अंकिताला समजते आपल्या सासऱ्यांचं आपल्या सासूपेक्षा अभिनेत्री रेखावर प्रेम आहे. आणि जेव्हा अंकिताला सांगते तेव्हा सासु म्हणते या रेखा समोर माझं काही चालत नाही. हे ऐकताच सुनबाई सासुबाईच्या मदतीला येते आणि एक प्लॅन करते अन् सासूला रेखा सारखा लूक देते.
झी मराठीवरील महारविवारी करणार हा भाग पाहायला मिळणार आहे. शंतनुने सासुला लाल रंगाचा अनारकली ड्रेस घालून अभिनेत्री रेखा सारखा लुक केला आणि मुजरा सारख वातावरण केलंय. सासुला सासऱ्यासमोर 'दिल चीज हे क्या ' या गाण्यावर मुजरा केला आहे. सुकन्या मोघे यांनी देखील मस्त मुजरा सारखी अदा देऊन मुजरा केला आहे.
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई? मालिकेचा हा महाएपिसोड 29 जानेवारी, रविवार दु. 12 आणि रात्री. 9 वा. झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या हलक्या फुलक्या मालिकेत धम्माल कॉमेडी असून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.