Urfi Javed: उर्फी जावेद रेस्टोबॉरमध्ये झाली वेटर, अभिनेत्रीने खरं कारण सांगताच लोकांनी केलं कौतुक

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता
https://www.esakal.com/manoranjan/urfi-javed-entertainment-celebrity-fashion-sense-new-video-viral-fans-shocked-comment-yst88
https://www.esakal.com/manoranjan/urfi-javed-entertainment-celebrity-fashion-sense-new-video-viral-fans-shocked-comment-yst88SAKAL

Urfi Javed News: उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फीच्या फॅशनचं कौतुक कमी तर टिका जास्त होत असते. पण अशातच एका कारणामुळे उर्फीचं कौतुक झालंय.

मुंबईतील रेस्टोबार 'द नाइन्स' इथला उर्फी जावेदचा वेटर बनल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ती वेटर का बनली होती? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण आज उर्फीने स्वतःच या व्हिडिओमागचं खास कारण सांगितलं आहे.

https://www.esakal.com/manoranjan/urfi-javed-entertainment-celebrity-fashion-sense-new-video-viral-fans-shocked-comment-yst88
माधवी निमकरची नवीन साडी आणि फोटोशूटची चर्चा, तुम्हाला आवडलं?

उर्फीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती वेटर बनून लोकांना प्रेमाने जेवण सर्व्ह करताना दिसतेय. याशिवाय ती लोकांसोबत आपुलकीने गप्पा मारतानाही दिसतेय.

उर्फीचा वेटर बनल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आज तिने इंस्टाग्रामवर ही खास गोष्ट उघड करताना सांगितलं की, तिने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनसाठी निधी उभारण्यासाठी वेट्रेस होण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये तिने खुलासा केला आहे

उर्फी लिहीते, "स्वप्न साकार झालं! कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. ते सर्व दृष्टीकोनावर अवलंबून असते. मला एक तास वेट्रेस म्हणून काम करायचं होत आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनमध्ये निधी देण्यासाठी मी ही हक्काची कमाई केली. @cpaaindia @suved @theninesmumbai यांना हे घडवून आणल्याबद्दल त्यांचे खूप आभार."

असं कॅप्शन देत उर्फीने हा खुलासा केलाय.

https://www.esakal.com/manoranjan/urfi-javed-entertainment-celebrity-fashion-sense-new-video-viral-fans-shocked-comment-yst88
PM Modi Christmas Celebration: पंतप्रधान मोदींसोबत अभिनेता डिनो मोरियाने केलं ख्रिसमस सेलिब्रेशन

अभिनेत्री उर्फी जावेदचे हे पाऊल अनेकांना प्रेरणा देणारे आहे. तिला या ख्रिसमसमध्ये काहीतरी अर्थपूर्ण करुन सिक्रेट सांता बनून लोकांना मदत करायची होती.

तिने त्या रात्री हॉटेलमधल्या कर्मचार्‍यांशी खूप छान संवाद साधला. याशिवाय तिने काही टिप्स घेतल्या. या टिप्सचा वापर ती आता कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com