Beed tehsildar accident news
esakal
बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील नेहरूनगर कॉर्नरजवळ झालेल्या कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे (Beed Tehsildar Accident News) महसूल प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.