

A cyber fraud case involving a ₹43 lakh loss through a digital arrest scam has been registered in Mukundwadi, Chhatrapati Sambhajinagar.
esakal
मुकुंदवाडी: डिजिटल अरेस्टसारख्या प्रकारातून फसवणुकीच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. विश्वास बसेल, अशी थाप मारली जात असल्याने नागरिकही सहज अशा धमक्यांना घाबरून सायबर भामटे सांगतील ते करतात. त्यामुळे आयुष्यभराची जमापुंजी तर जातेच; परंतु तब्बल १४ दिवसांपर्यंत घराबाहेर न हलू देता ‘डिजिटल अरेस्ट’सारखे प्रकार समोर आले. असाच एक प्रकार सिडको एन-२ भागात समोर आला. ४६ वर्षीय योगेश गुजर यांना डिजिटल अरेस्ट करत ४३ लाख रुपये खात्यातून लांबविले. या प्रकरणी विजय खन्ना, राहुल गुप्ता आणि एका मोबाइल नंबर धारक अशा तिघा भामट्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाला.