

Voters cast their ballots in the Marathwada Graduate Constituency election, with counting scheduled for October 27.
esakal
छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २३) आठही जिल्ह्यांत शांततेत मतदान प्रक्रिया झाली. सरासरी ५८.६७ टक्के मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग काहीसा कमी होता, तो दुपारी बारानंतर वाढला. येत्या मंगळवारी (ता. २७) मतमोजणी होणार आहे.
मराठवाड्यात ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ५४ हजार ७४८ पुरुष मतदार आणि ३६ हजार ९४० महिला मतदार अशा एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जिल्हाभरात ठिकाठिकाणी केंद्रांवर पाहणी करत सर्व जिल्ह्यांतील प्रक्रियेचा आढावा घेतला. जी. श्रीकांत यांनी शहरातील मतदान केंद्र क्रमांक १०९ मध्ये मतदानाचा हक्क बजावला.