Pre-Monsoon : मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच; नदी-नाल्यांना आले पाणी, मशागतीची कामे खोळंबली, तापमानात कमालीची घट
Unseasonal Rain : मराठवाड्यात सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले असून तापमानात कमालीची घट झाली आहे. ही सरी धरणीकडील हिरवळ वाढवत असल्या, तरी मशागतीच्या कामांवर परिणाम झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हामुळे मे महिन्यात नागरिक बेजार झालेले असतात. रानोमाळ पानझड दिसून येते. नद्या-नाले कोरडेठाक असतात. मात्र, यंदा हे चित्र मॉन्सूनपूर्व पावसामुळे बदलले.