

Shagufta Shaikh Success Story How a Farmers Laborers Daughter Overcame Financial Struggles to Secure Six Government Job Selections
esakal
सातारा : घरची बेताची आर्थिक परिस्थिती, वडील ट्रकचालक आणि आई शेतमजूर करतात. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात असते, याचा प्रत्यय धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या शगुफ्ता शेख यांच्या प्रवासातून येतो. आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव, स्पर्धा परीक्षांमधील अपयश आणि मानसिक खचलेपण अशा अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. आज सहा सरकारी पदांवर निवड मिळविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली असून, ‘कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी’ या पदावर त्यांची निवड झाली आहे.