मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Central Railway Megablock: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बदलणार असल्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Central Railway Megablock

Central Railway Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत दिनांक १०/११.०४.२०२६ रोजी टिटवाळा व वासिंद स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक प्लॅटफॉर्म विस्तार कामांसाठी (१५ डब्यांच्या गाड्यांची सोय करण्यासाठी) आवश्यक असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी तसेच टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉइंट्सवर ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कार्यान्वित करण्यासाठी घेण्यात येत आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com