Diesel Shortage: उद्योग, मालवाहतूक अडचणीत डिझेल टंचाईचा महामुंबईतील व्यावसायिकांना फटका

Freight Services : राज्यातील वाढत्या डिझेल टंचाईमुळे उद्योग आणि मालवाहतूक सेवा अडचणीत येत आहेत. पेट्रोलपंपांवर डिझेल मिळत नसल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.
Diesel Shortage

Diesel Shortage

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील वाढत्या डिझेल टंचाईचा मोठा फटका मालवाहतुकीसह उद्योग क्षेत्रालाही बसत आहे. जेएनपीए, कळंबोली, ठाणे, नवी मुंबईसह महामुंबईतून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. एकट्या जेएनपीए परिसरातच ३८ ते ४० हजार ट्रेलर कार्यरत आहेत; मात्र अनेक पेट्रोलपंपांवर डिझेल मिळत नसल्याने उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com