

Mumbai BMC Bomb Threat
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी शाळा, विमानतळ उडवण्याचे धमकीचे मेल येत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील पालिका कार्यालय आणि शाळा बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. ''मुंबई बॉम्बे बोलेगा - खलिस्तान झिंदाबाद!, आपल्या मुलांना वाचवा'' अशा आशयाचा मेल मुंबईचे महापौर रितू तावडे यांना आला आहे. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.