Mumbai Municipal Corporation
महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation). येथे २२७ नगरसेवक निवडून दिले जातात. २०१७ मध्ये शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकत जवळपास समान ताकद दाखवली होती. काँग्रेस, मनसे आणि इतर पक्ष मागे पडले. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, काँग्रेस आणि मनसे या पक्षांमध्ये थेट सामना होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुका नेहमीच राज्यातील राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरतात.