

Thane Police raid on spa center
ESakal
भाईंदर : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरु असून पोलिसांनी छापा टाकून कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शहरातील शाळेसमोरच घडत असलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ पसरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.