

Mumbai Accident Report
ESakal
मुंबई : मुंबईत विविध आपत्कालीन दुर्घटनांमध्ये २०२० ते सप्टेंबर २०२६ या साडेसहा वर्षांच्या कालावधीत ७२० नागरिकांचा मृत्यू झाला असून, २,४०८ जण जखमी झाले आहेत. इमारतींची पडझड, आगी, समुद्रात बुडणे आणि मॅनहोल किंवा नाल्यांत पडण्यासारख्या दुर्घटनांमुळे होणारी जीवितहानी मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.