मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज, नेमकं काय घडलं?

Mumbai Local Train Blast Sound at Vile Parle Station : पक्ष्याचा ओव्हरहेड वायरशी संपर्क आल्यानं हे स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती समजते. रेल्वे प्रशासनाचे याची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
Mumbai Local Train Blast Sound at Vile Parle Station :

Mumbai Local Train Blast Sound at Vile Parle Station :

esakal

Updated on

मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर रविवारी अचानक सलग पाच स्फोटांसारखे मोठे आवाज ऐकू आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आवाज इतके तीव्र होते की अनेक प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवरून धावाधाव सुरू केली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित लोकल ट्रेन तातडीने रिकामी करण्यात आली आणि रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com