

Pradeep Purnekar Murder Case
ESakal
ठाणे : मानपाडा परिसरातील शिवसेनेचे (यूबीटी) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे मिळू लागले आहेत. हल्ल्यात नीलेश पवार याने थेट गोळीबार केला, तर त्याचा साथीदार निखिल यादव याने पूर्णेकर यांच्यावर चॉपरने वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.