Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Railway Administration: लोकलच्या सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे नोकरदार प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र यावर मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर होत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केल्याचे समोर आले आहे.
Mumbai Local Train Delay

Mumbai Local Train Delay

ESakal

Updated on

मुंबई : डहाणू-चर्चगेट (९३००२) लोकलच्या सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या एका प्रवाशाने समाजमाध्यमावर तक्रार नोंदविली. बोईसर स्थानकात ही लोकल सलग १० दिवस उशिराने पोहोचत असल्याने रोज 'लेट पंचिंग'चा फटका बसत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. यावर विलंबामागील परिचालनातील कारणे स्पष्ट करण्याऐवजी पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या दारात प्रवाशांनी अडथळा निर्माण केल्यामुळे पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला, असे उत्तर दिले. त्यामुळे रेल्वेने विलंबाचे खापर प्रवाशांवरच फोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com