बेळगाव : दुहेरी हत्याकांड खटल्यात एकाला जन्मठेप

सौदत्तीतील घटना; मुलगी, प्रियकराचा खून
Murder
Murdersakal
Updated on

बेळगाव : दुहेरी हत्याकांड खटल्यात एकाला जन्मठेपेची शिक्षा (imprisonment)अकरावे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी आज (ता.१३) ठोठावली. यल्लाप्पा भिमाप्पा आडीन (वय ५५, रा. बेटसूर, ता. सौदत्ती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एप्रिल २०१७ मध्ये बेटसूरला घटना घडली आहे.याबाबत माहिती अशी की, आरोपी यल्लाप्पा याची मुलगीचे गावातील तरुणावर प्रेम होते. ते नियमित भेटायचे. आरोपी सिध्दप्पा याचा त्याला विरोध होता. तसेच याबाबत मुलगी आणि तरुणाला समज दिली होती.

Murder
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

पण, त्याचा फरक पडला नाही. परत दोघे एकमेकांना भेटत असल्याची माहिती होती. यामुळे यल्लाप्पा अस्वस्थ होते. याबाबत प्रचंड चीड त्यांना होती. २७ एप्रिल २०१७ रोजी आरोपीची पत्नी व मोठी मुलगी गावात नातेवाईकांकडे राहायला गेल्या होत्या. यादिवशी घरी वडील व लहान मुलगी दोघे होते. वडील रात्री घराच्या परसात झोपले होते. तर मुलगी घरी झोपली होती. २७ अप्रिल पहाटे १.३० च्या सुमारास वडिलांना घरात कुजबूज ऐकू आली. त्यामुळे घरात डोकावू पाहिल्यानंतर मुलगी व तिचा प्रियकर मंजू भिमाप्पा पडेसूर (वय २०, रा. बेटसूर) खोलीत आढळले. यामुळे राग अनावर झालेल्या यलाप्पा याने पडेसर व त्याच्या मुलगीवर कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.(Crime News)

Murder
रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

यानंतर आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन दुचाकीवरून सौदत्ती पोलिस ठाणे गाठले आणि दुहेरी खुनाची कबुली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रसाद फणेकर यांनी गुन्हा दाखल करून घेतला. तसेच कुऱ्हाड जप्त केली. दाव्याची अंतिमसुनावणी ११ वे जिल्हा सत्र न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांच्यापुढे झाली. न्यायाधीशांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि पंन्नास हजार रुपयांचा दंड ठोठाविला आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. एस. मंटूर यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी वकील म्हणून शैलजा पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com