रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील; केजरीवालांचा छातीठोक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind kejriwal

रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

मोहाली : पंजाब कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘पंजाब मॉडेल’ लॉंच केले आहे. पंजाबमध्ये रोजगारनिर्मिती एवढ्या प्रमाणात करू की कॅनडातील शिख देखील पंजाबमध्ये परततील, असा विश्‍वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. दिल्लीत दहा लाख रोजगार निर्मितीचा दावा त्यांनी केला. अमली पदार्थाचा विळखा पंजाबला पडला असून त्याविरोधात कॉंग्रेस सरकारने काहीच केले नाही. ‘आप’चे सरकार अमली पदार्थाची तस्करी थांबवेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

मोहाली येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, की पक्षात कोणीही तिकीट खरेदी केले नाही आणि विकले नाही. ‘आप’ पक्ष प्रामाणिक असून कोणी जर पुरावा आणून दिला तर चोवीस तासाच्या आत तिकीट विकणाऱ्यास आणि खरेदी करणाऱ्यास पक्षातून काढून टाकेल. नरकापर्यत त्याचा पाठलाग करेल, तुरुंगात पाठवेल. चुकीचे आरोप करणाऱ्यांना देखील सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि बादल कुटुंबीय भागिदारीतून राज्य करतात. १९६६ मध्ये पंजाब राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून २५ वर्ष कॉंग्रेस आणि १९ वर्ष बादल कुटुंबाने राज्य केले आहे. दोघेही वाटून खातात. दोघेही आपल्या कार्यकाळात एकमेकाविरोधात कारवाई करत नाहीत, असा आरोप देखील केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा: राज्यात कोरोनाचा आलेख वाढला; 46,723 रूग्णांची नोंद

आपचे सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडवले जातील. ज्या गोष्टी केंद्राच्या आखत्यारित आहेत, त्यांच्यासाठी संघर्ष करू, असेही ते म्हणाले. पंजाबच्या सरकारी शाळांची स्थिती खराब झाली आहे. मुलांना शिकवण्याऐवजी शिक्षक विविध मागण्यांसाठी रस्त्यावर संघर्ष करत आहेत. शिक्षणाचा स्तर सुधारण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. दिल्लीप्रमाणेच १६ हजार मोहल्ला क्लिनिक, दर्जेदार सरकारी रुग्णालय आणि पंजाबच्या तीन कोटी लोकांवर प्रत्येक आजारवर मोफत उपचार केला जाईल, असे त्यांनी आश्‍वासन दिले.

केजरीवाल यांचे पंजाब मॉडेल

  • गावात खुलेआम अमली पदार्थाची विक्री होत असून माफियाला आळा घालणार

  • पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणार

  • पंजामध्ये चोवीस तास मोफत वीज

  • महिलांना एक हजार रुपये. १८ पेक्षा अधिक वयोगटातील महिलांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Arvind KejriwalAAP Member
loading image
go to top