कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू (Coronavirus) हवेमध्ये पसरल्यानंतर पहिल्या २० मिनिटांनंतर ९० टक्क्यांनी कमी प्रभावी होतो. पहिल्या पाच मिनिटांनंतरच त्याची इतरांना संक्रमित करण्याची क्षमता तो गमावून बसतो. हवेमध्ये कोरोना विषाणू कशाप्रकारे अस्तित्वात राहतो, याबाबत संशोधन करणाऱ्या एका संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. (exhaled air)

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेवरून किरण बेदी म्हणतात, ''अधिकाऱ्यांना मोठी...''

युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल्स ऍरोसल रिसर्च सेंटरमध्ये या संशोधनातील निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधनातून कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी मास्क परिधान करण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, श्वासोच्छवासानंतर एकाच्या नाकातोंडातून बाहेर पडलेला कोरोना विषाणू हवेतून कशाप्रकारे प्रवास करतो याचा अभ्यास या संशोधनातून पुढे आला आहे.

मला असं वाटतं की तुम्ही एखाद्याच्या जवळ असता तेव्हा संपर्कात येण्याचा सर्वात मोठा धोका असतो,” असं या अभ्यासाचे प्रमुख लेखक प्राध्यापक जोनाथन रीड यांनी द गार्डियनला सांगितलंय.

हेही वाचा: दिल्ली भाजप मुख्यालयात कोरोनाचा स्फोट; 42 कर्मचारी पॉझिटिव्ह

याबाबत संशोधन करण्यासाठी संशोधकांनी विषाणूवर थेट अभ्यास केला. जेंव्हा एखादा विषाणू हवेत जातो तेंव्हा त्याचं काय होतं, याचं अनुकरण करण्यासाठी, संशोधकांनी विषाणूयुक्त कणाच्या प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी एक उपकरण विकसित केलं आणि त्यास एका नियंत्रित अशा वातावरणात पाच सेकंद ते २० मिनिटांच्या दरम्यान दोन इलेक्ट्रिक रिंग्समध्ये तरंगत राहू दिलं.

संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, जेंव्हा विषाणूचे कण फुप्फुस सोडून बाहेर पडतात, त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होत जातं आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रभावामुळे विषाणूच्या pH ची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे इतर मनुष्याला संक्रमित करण्याची विषाणूची क्षमता तुलनेने कमी होते, असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

एखाद्या सर्वसामान्या कार्यालयीन वातावरणात, ज्याठिकाणी सभोवतालच्या वातावरणाची आर्द्रता ही सामान्यत: 50 टक्क्यांहून कमी असते, त्या ठिकाणी पहिल्या पाच सेकंदातच हा विषाणू अर्ध्याहून अधिक कमी संक्रामक होतो. त्याच्या या संसर्ग करण्याच्या क्षमतेमध्ये तातडीने घट झाल्यामुळे त्याची संसर्गजन्यता हळूहळू कमी कमी होत जाते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusCovid -19
loading image
go to top