

Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
esakal
- राजेंद्र दळवी
पन्हाळा: पन्हाळ्यासारख्या डोंगराळ तालुक्यात पावसाळ्यात पूर, भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नवीन नाहीत. अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली असली, तरी प्रत्यक्षात मात्र "आपत्ती व्यवस्थापन नाही थाऱ्यावर, अन जनता वाऱ्यावर" अशीच स्थिती पन्हाळ्यात पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पहाटे वाघबीळ-पन्हाळा रस्त्यावर वडाचे मोठे झाड कोसळल्याने मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला. मात्र, नेहमीप्रमाणे मुख्य यंत्रणा गायब असताना केवळ पन्हाळा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.