Vishalgad Kolhapur Current Situation : सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली होती. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घरं आणि दुकानांची जाळपोळ केली. यात स्थानिक नागरिकांचे मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपतींसह ५०० जणांवर गुन्हा दाखल केला होता, तर २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.