

Gokul Election Result live update
esakal
Gokul Election Result 2026 : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत सर्वसाधारण गटातील १ हजार ६५० मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेत असून, महायुतीचे सर्व उमेदवार ४० ते ५० मतांच्या किरकोळ फरकाने आघाडीवर आहेत. दरम्यान, काही तालुक्यांमध्ये राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.