इचलकरंजीतील ऑइल निर्मितीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग

कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक झाली आहे.
fire
fireesakal
Updated on: 

तारदाळ : वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागून मोठा भडका उडाला. कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या औद्योगिक वसाहतीमधील विजेता प्रॉडक्ट या ऑइल कंपनीचे आगीत सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास लागलेली आग तीन तासांनी आटोक्यात आणली. तब्बल 25 हुन अधिक अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यास मदत झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.

fire
सुभाष बाबूंनी नेहरुंना लिहिलेलं पत्र शेअर करून थरुर म्हणतात, काय वेळ आली?

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क नावाची औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत गेल्या सहा महिन्यांपासून विजेता प्रोडक्ट हा वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीचा कारखाना सुरु होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक या कारखान्यात आग लागली. ऑइलसारख्या जळाऊ पदार्थ कारखान्यात असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोट दूरवरून दिसत होते. घटनास्थळी प्रसंगावधान राखत जीवितहानी टळली. आसपासच्या नगरपालिका हद्दीतील तसेच सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 25 अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अडीच तासानंतर आग विझवण्यात यश आले. आगीत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.

fire
देवाची निंदा करणं भोवलं, महिलेला कोर्टानं सुनावली फाशीची शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Politics Chairman Election satej patil hasan mushrif
Kolhapur Gokul chairman election latest news
Chandrakant Patil Teachers Constituency election news
Teacher Constituency Records 88.62% Polling While Graduate Constituency Sees 63.83% Turnout in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com