सुभाष बाबूंनी नेहरुंना लिहिलेलं पत्र शेअर करून थरुर म्हणतात, काय वेळ आली?

तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलो आहोत ? - शशी थरूर
शशी थरूर
शशी थरूरईसकाळ
Summary

तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलो आहोत ? - शशी थरूर

देशाचं राजकारण हे नेहमीचं सत्ताधारी आणि विरोधक यांच्याभोवती फिरत असतं. राजकीय वर्तुळात दररोज अनेक घडामोडी घडतं असतात. यात विरोधक, सत्ताधारी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत असतात. दरम्यान, यावरून कॉंग्रेस खासदार शशी थरुर (shashi tharoor) यांनी एक पत्र ट्वीट केलं आहे. हे पत्र स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस (netaji subhash chandra bose) यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांना लिहिलेलं आहे. पत्र शेअर करताना ते म्हणतात, या पत्रात आपले राजकीय नेते वाचायचे, लिहायचे, विचार करायचे आणि एकमेकांची काळजीही करायचे. तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलो आहोत ? असा सवालही त्यांनी केला आहे.

सुभाषचंद्र बोस यांनी या पत्रात लिहिलं आहे की, 'प्रिय जवाहर, तुमचं पत्र मिळालं. तुम्ही खूप काम करत आहात असं मला समजलं. मला तुमच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते आहे. मात्र, मला याचा आनंद आहे की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना पण काम थांबवून मसूर येथे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.' दरम्यान, खासदार थरुर यांनी ट्वीट केलेलं सुभाषचंद्र बोस यांचं हे पत्र ३० जून १९३६ रोजी दार्जिलिंगच्या पोलिस अधीक्षकांच्या घरून लिहिलेलं आहे.

शशी थरूर
चला मुलांनो चला, शाळेत जाऊ चला; शिक्षण मंत्र्यांची कविता वाचली का?

पुढे ते म्हणतात, मला याची कल्पना आहे की, अधिकचं काम टाळणं तुमच्यासाठी किती कठीण जात असेल. तुमच्या या सर्मपणाचं मी तुमचं कौतुक करतो. मात्र, तुम्ही स्वतःला फार त्रास करुन घेऊ नका. जर तुमची प्रकृती बिघडली कोणालाही मदत होणार नाही. या पत्रात नेताजींनी नेहरु यांच्या मेव्हुण्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. ते म्हणतात, तुमच्या मेव्हु्ण्याबद्दल ऐकून दु:ख झाले, मात्र त्यांना आता कोणताही गंभीर धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते आजारातून लवकर बरे होतील अशी आशा करुयात, असे भावनिक आणि काळजी घेणारे पत्र त्यांनी लिहले आहे.

शशी थरूर
Winter Hair Colour Tips: हिवाळ्यात ट्राय करा 'हे' हेअर कलर

नेहरूंनी बोस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली होती. त्याला उत्तर देताना सुभाषचंद्र बोस म्हणाले, “मी इथं चांगला आहे. माझ्या आतड्यांना केवळ थोडा त्रास आहे. तसेच मला घशाच्या संसर्गामुळे ताप आलाय. मात्र, वेळ जाईल तसा हा तापही जाईल, अशा आशयाचे ते पत्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com