

Kolhapur Accident News
Esakal
कोल्हापुरात मध्यरात्री कारने धडक दिल्यानं भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पद्मसिंह रणजितसिंह पाटील याला अटक करण्यात आलीय. पद्मसिंह हा गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आलीय.